मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आपलं खासगी आयुष्य सगळ्यांपासून लांब ठेवतात.
यामागे प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत.
पण मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीने पहिल्यांदा नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
लग्नाच्या 22 वर्षांनंतर हे फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये याची उत्सुकता वाढली आहे.
अभिनेत्रीचं नाव आहे पूर्णिमा तळवलकर असून तिने 2002 साली रोहित तळवलकर यांच्यासोबत लग्न केलं.
रोहित तळवलकर हे स्मिता तळवलकर यांचे पुतणे आहेत.
पूर्णिमा तळवलकरने लग्नानंतर चार वर्षे ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात वळली.
'तुला जपणार आहे' या मालिकेत पूर्णिमा तळवलकर काम करत आहे.