झी मराठी वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

तिच्या पहिल्या मालिकेमुळेच ती लोकप्रिय झाली. त्यानंतर असंख्य मालिका आणि चित्रपटातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सायलीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे.

आता सायलीने फिल्मफेअर सोहळ्यासाठी केलेल्या खास लूकचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी तिने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता.

या लूकला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलही तिने केली होती.

सायलीने या फोटोंना 'ब्लॅक लेडी' असे कॅप्शन दिले आहे.

सायलीच्या या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

VIEW ALL

Read Next Story