'मिर्झापूर' ही करण आयुषमान आणि पुनित कृष्णा यांची निर्मिती असलेली वेब सिरीज आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथील गुन्हेगारांमधील संघर्ष यात दाखवण्यात आला आहे.
'मिर्झापूर'चं तिसरं पर्व 5 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे.
'मिर्झापूर'मध्ये पंकज त्रिपाठींनी साकारलेली कालिन भय्याची भूमिका अजरामर झाली आहे. तसेच या मालिकेत अली फजल, दिव्यांदू, विजय वर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठीही आहेत.
'मिर्झापूर'चा दुसरा सिझन 2020 साली प्रदर्शित झाला होता. या गोष्टीला आता 4 वर्ष झाली असून तिसऱ्या पर्वाचा टीझर नुकताच लॉन्च झाला.
'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सिझनचा टीझर अनेकांना आवडला असला तरी बहुतांश प्रेक्षकांनी आपण या तिसऱ्या पर्वासाठी फारसे उत्साही नसल्याचं म्हटलं आहे.
आता चाहते 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सिझनबद्दल एवढे निरुत्साही का आहेत? ते हा सिझन पाहणार नाही असं का म्हणत आहेत? जाणून घेऊयात 3 कारणं...
'मिर्झापूर'च्या तिसऱ्या पर्वात मुन्ना भय्या हे पात्र नसणारं असं सांगितलं जात आहे. 'मिर्झापूर 2'च्या शेवटच्या सीनमध्ये मुन्ना भय्यांची हत्या झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यंदाचं पर्व न पाहण्याचं हे एक प्रमुख कारण आहे.
'मिर्झापूर 3'च्या माध्यमातून निर्मात्यांना केवळ पैसे कमवायचे आहेत, असा काही चाहत्यांचा दावा आहे. त्यामुळे केवळ हिंसाचार आणि मारहाण असणारा शो आपण पाहणार नसल्याचं काहींचं म्हणणं आहे.
अनेक चाहत्यांनी 'मिर्झापूर'चा हा तिसरा भाग फारच उशीरा प्रदर्शित होत असल्याचं म्हटलं आहे.
'मिर्झापूर'च्या दुसऱ्या पर्वानंतर तब्बल 4 वर्षांनी पुढचं पर्व आलं आहे. त्यामुळे याबद्दलचा उत्साह मावळल्याने आपल्याला यात रस नसल्याचं काहींचं म्हणणं आहे.