रणबीरच्या 'रामायण' चित्रपटात कैकयीची भूमिका साकारणार 'मिस युनिव्हर्स'; जाणून घ्या तिचा खास प्रवास

Intern
Apr 18,2025


बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'रामायण'. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


या चित्रपटात भगवान प्रभू श्री रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. तर माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे.


आता या भव्य चित्रपटात आणखी एका महत्वाच्या भूमिकेची घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे कैकयीची.


या भूमिकेसाठी अभिनेत्री लारा दत्ताची निवड करण्यात आली आहे.


लारा दत्ता ही 2000 मध्ये 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.


करिअरच्या सुरुवातीला लारा मॉडेल केली डोरजीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी जवळपास 9 वर्षे एकमेकांना डेट केले. मात्र, लारा मिस युनिव्हर्स झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.


यानंतर तिचं नाव अमेरिकन गोल्फर टायगर वुड्ससोबत जोडलं गेलं. मात्र, लाराने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की, 'ही फक्त एक अफवा आहे.'


त्यानंतर अभिनेता डिनो मोरियासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. काही काळाने त्या नात्याचा देखील शेवट झाला.


पुढे लाराच्या आयुष्यात टेनिसपटू महेश भूपती आला. त्यावेळी महेश विवाहित होता.


2009 मध्ये महेशने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि 2011 मध्ये लाराशी लग्न केले. त्याच वर्षी लाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला.


'रामायण' चित्रपटात कैकयीसारख्या प्रभावशाली भूमिकेसाठी लारा दत्ता योग्य निवड मानली जात आहे. तिचे अभिनय कौशल्य आणि व्यक्तिमत्व या भूमिकेला योग्य न्याय देईल, असा प्रेक्षकांना विश्वास आहे.

VIEW ALL

Read Next Story