सिंघमसारखे चित्रपट समाजाला अत्यंत घातक संदेश देतात, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल यांनी शुक्रवारी मांडले आहे.
इंडियन पोलिस फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल यांनी आपले मत मांडले आहे.
सिंघम चित्रपटासारखे पोलीस कायद्याचे पालन न करून आणि त्वरित न्याय देऊन समाजाला चुकीचा संदेश देतात, असे न्यायाधिश गौतम पटेल म्हणाले.
या कार्यक्रमात न्यायमूर्ती पटेल यांनी सिंघमच्या क्लायमॅक्सचा उल्लेख केला. सिंघमच्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आले आहे जेथे प्रकाश राज यांना मारण्यासाठी संपूर्ण पोलीस विभाग येतो.
प्रकाश राजला मारून आता न्याय मिळाल्याचे दाखवले आहे. पण मी विचारतो, खरच न्याय मिळाला आहे का? तो मेसेज किती घातक आहे याचा विचार करायला हवा.
आपल्याला अशा प्रक्रियेतून जावे लागेल जिथे आपण निर्दोष आणि दोषी ठरवू. ही प्रक्रिया संथ असू शकते पण ती तशीच असायला हवी. जर आपण या प्रक्रियेत शॉर्टकट शोधले तर आपण कायद्याचे राज्यच नष्ट करू.
बर्याच चित्रपटांमध्ये, न्यायाधीशांना विनम्र, भित्रा, जाड चष्मा घातलेले आणि खराब कपडे घातलेले दाखवले जाते. निर्मात्यांनी कोर्टाने दोषींना सोडल्याचा आरोप केला, असेही पटेल म्हणाले.
'जेव्हा जनता न्यायालयांचा विचार करते तेव्हा त्यांना वाटते की ते त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत. आणि मग पोलीस काही कारवाई करतात तेव्हा त्यांना बरे वाटते, असेही पटेल म्हणाले.