ठरलं तर मग...'या' दिवशी विवाहबंधनात अडकणार शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य

user Soneshwar Patil
user Oct 30,2024


नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.


काही दिवसांपूर्वी शोभिता धुलिपालाने प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.


8 ऑगस्ट रोजी दोघांचा साखरपुडा झाला. आता त्यांच्या लग्नाची डेट समोर आली आहे.


रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे 4 डिसेंबर 2024 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.


चाहते देखील या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत. परंतु, लग्न सोहळ्याला जवळचे मित्रच उपस्थित असणार आहेत.


नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. 2017 मध्ये त्यांनी सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतला होता.

VIEW ALL

Read Next Story