अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' फ्रेंचायझीला त्याचा स्वतःचा फॅनबेस आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग ब्लॉकबस्टर ठरले.
सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखालील 'पुष्पा' चित्रपटाने दोन भागांत प्रचंड यश मिळवले.
'पुष्पा: द राइज' चित्रपटाने जागतिक स्तरावर 350 कोटी रुपये कमावले, तर 'पुष्पा: द रुल' ने 1871 कोटी रुपये कमावले.
या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई 2221 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
2221 कोटींची कमाई करणाऱ्या 'पुष्पा'च्या तिसरा भागाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे.
परंतु निर्माते रविशंकर यांनी सांगितले की, अल्लू अर्जुन सध्या दोन प्रमुख प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत- एक एटलीसोबत आणि दुसरा त्रिविक्रमसोबत. त्यासोबतचं दिग्दर्शक सुकूमारही राम चरणसोबत एका प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहेत.
यामुळे 'पुष्पा 3' च्या निर्मितीला किमान तीन वर्षांचा वेळ लागणार आहे.
चित्रपट निर्माते रविशंकर यांच्या मते, 'पुष्पा 3' 2028 साली प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये आलेला, तर दुसरा भाग 2024 मध्ये रिलीज झाला.