एकटी ऐश्वर्या राय 776 कोटींची मालकीण! चित्रपट न करतानाही एवढी श्रीमंत कशी? पाहा Details

आवर्जून घेतलं जातं नाव

आजही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास ऐश्वर्या रायचं नाव आवर्जून घेतलं जातं.

मोजक्याच चित्रपटांमधून दिसली

अर्थात मागील काही वर्षांपासून ऐश्वर्या अगदीच मोजक्याच चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.

'पीएस-2'मध्ये दिसली

ऐश्वर्या शेवटची 'पीएस-2' चित्रपटामध्ये दिसली होती.

दरवर्षी 'कान्स'मध्ये दिसते

दरवर्षी ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर दिसते.

सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक

सासरच्या लोकांची संपत्ती वगळली तरी ऐश्वर्या राय ही चित्रपटांपासून दूर असूनही बी-टाऊनमधल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

776 कोटी रुपये संपत्ती

ऐश्वर्याची एकूण संपत्ती ही 776 कोटी रुपये इतकी आहे. पण तिच्या या संपत्तीमध्ये नेमका कसला समावेश होतो पाहूयात...

कमाईत चित्रपटांचा महत्त्वाचा वाटा

ऐश्वर्याच्या संपूर्ण करिअरचा विचार केल्यास तिच्या आर्थिक कमाईचा सर्वात महत्त्वाचा वाटा हा चित्रपटांचा आहे.

2 दशकांपासून चित्रपटांमध्ये काम

ऐश्वर्या मागील 2 दशकांपासून चित्रपटांमध्ये काम करत असून ती प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी मानधन घेते.

पालकांबरोबरच राहतात

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे दोघे लग्नानंतरही पालक अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर 'जलसा' या निवासस्थानी राहतात.

दुबईत आलिशान बंगला

पण ऐश्वर्या आणि अभिषेकने दुबईमधील 'जुमैर गोल्फ इस्टेट'मध्ये आलिशान बंगला घेतला आहे.

दुबईतील बंगल्याची किंमत किती?

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या दुबईतील या बंगल्याची किंमत 15 कोटी रुपयांहून अधिक आहे.

21 कोटींचा फ्लॅट

संपत्तीचा विचार केल्यास ऐश्वर्या अन् अभिषेकच्या नावावर मुंबईत एक 21 कोटींचा फ्लॅटही आहे.

कमाईचा प्रमुख स्त्रोत

ब्रॅण्ड एण्डोर्समेंट हा सुद्धा ऐश्वर्याच्या कमाईचा प्रमुख स्त्रोत आहे.

मोठ्या ब्रॅण्डचा चेहरा

'लॉरीएल'सारख्या मोठा ब्रॅण्ड ऐश्वर्यामुळे ओळखला जातो.

80 ते 90 कोटी रुपये

एका वृत्तानुसार दरवर्षी ऐश्वर्याला जाहिरातीसंदर्भातील करारामधून 80 ते 90 कोटी रुपये मिळतात.

दिवसाचं मानधन 6 ते 7 कोटी

जाहिरातीच्या शूटसाठी किंवा ब्रण्डींगसंदर्भातील कार्यक्रमांसाठी ऐश्वर्या एका दिवसाला 6 ते 7 कोटी रुपये मानधन आकारते.

7.95 कोटींची घोस्ट कार

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही रोल्स रॉयस कारची मालकीण आहे. तिच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट ही 7.95 कोटींची कार आहे.

1.60 कोटींची कार

याशिवाय ऐश्वर्याकडे मर्सिडीज बेन्स एस 350 डी क्यूप ही 1.60 कोटींची कार आहे.

या 3 महागड्या गाड्यांचीही मालकीण

तसेच ऑडी ए 8 एल ही 1.58 कोटींची तसेच लेक्सस एलएक्स 570 आणि मर्सिडीज बेन्स एस 500 ही ऐश्वर्याकडे आहे.

VIEW ALL

Read Next Story