भारतीय अभिनेत्री आणि उद्योजिका पारुल गुलाटीने 16 मे 2025 रोजी 78व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पदार्पण केलं.
यावेळी लक्षवेधी ठरला तो तिचा लूक.
अभिनेत्री आणि उद्योजिका पारुल गुलाटीने कान्समध्ये तिच्या बिझनेसला हायलाईट करून केसांपासून बनवलेला ड्रेस घातला होता.
जेव्हा ती रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या
तिचा संपूर्ण ड्रेस हा केसांच्या वेण्या वापरून तयार करण्यात आला होता.
या आऊटफिटची आयडिया ही स्वतः पारुलची होती आणि प्रसिद्ध स्टायलिस्ट मोहित राय आणि डिझायनर ऋद्धी बन्सलने हा ड्रेस त्यानुसार तयार केला.
हा आऊटफिट बनवण्यासाठी 12 कुशल कारागिरांनी एक महिना मेहनत घेतली होती.