सैफ अली खान

सैफ अली खानच्या फीबद्दल बोलायचे झाले तर सैफला ‘आदिपुरुष’ चित्रपटात ‘रावण’ची भूमिका करण्यासाठी 12 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सोनल चौहान

याशिवाय सोनल चौहान यांना 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.

देवदत्त नागे

हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागेला 6 कोटी हून अधिक रुपये मिळाले आहेत.

सनी सिंग

आदिपुरुषमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगला 1.5 कोटी रुपये मिळाले आहे, असा दावा करण्यात येत आहे.

क्रिती सेनन

या चित्रपटात माता सीतेच्या महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. क्रितीला या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मिळाले आहेत.

प्रभास

प्रभासने रामची भूमिका साकारण्यासाठी भलमोठी रक्कम आकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रभासने या चित्रपटासाठी जवळपास 150 कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.

सर्वात महागडा भारतीय चित्रपट?

प्रभासच्या या चित्रपटाची घोषणा 2020 मध्ये अधिकृत मोशन पोस्टरद्वारे करण्यात आली होती. या चित्रपटातील संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. चित्रपटाचे बजेट 700 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे.

VIEW ALL

Read Next Story