अभिनय आणि सौंदर्यामुळे सतत चर्चेत असणारी प्राजक्ता माळी तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुढीपाडव्या निमित्त खास फोटोशूट केलं आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे लाल रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोत अभिनेत्रीने नाकात नथ आणि तांब्याच्या धातूपासून बनवण्यात आलेले अलंकार परिधान केलेत.
त्यासोबतच अभिनेत्री कंबरपट्टा आणि शिंदेशाहीतोडे परिधान केलेत. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
अभिनेत्री नेहमी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत असते.