अभिनेत्री प्राजक्ता माळीने 13 ऑगस्ट रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली.
यावेळी महिला कैद्यांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. प्राजक्ताला तिथे एक झाड भेट म्हणून देण्यात आलं.
या भेटीत तिने महिला कैद्यांशी संवाद साधला. तसेच काही खेळ देखील खेळले आणि ‘ओमकार’चा जपही केला.
महिला कैद्यांशी बोलताना तिने आपल्या आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न करते असेही सांगितले.
प्राजक्ता माळीने तिथे महिला कैद्यांसाठी छोटं ध्यानधारणा सत्र आयोजित केले होते.
ती म्हणाली की, एखाद्याची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा सेवेचा सर्वोत्तम प्रकार आहे.
गुरुदेवांच्या शिकवणीनुसार अधूनमधून रुग्णालय, तुरुंग आणि शेतांना भेट देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्राजक्ता माळीच्या या उपक्रमाचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.