अभिनेता प्रसाद ओक याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोबतच त्याचा आता 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याच्या चित्रीकरणला सुरूवात झाली आहे.

मंजिरी ओक आणि प्रसाद ओक अनेकदा सोशल मीडिायावरून आपले फॅमिली फोटोज आणि अपडेट्स शेअर करताना दिसतात.

त्यांना दोन मुलं आहेत. मयंक आणि सार्थक ओक. त्यांच्या मुलांसोबतचेही अनेक प्रेमाचे क्षण ते चाहत्यांसोबत शेअर करतात.

नुकतेच त्यांनी आपले फोटो शेअर केले आहेत ज्यात सार्थक ओकनं जर्मनीतून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. यावेळी त्याच्या कॉनव्होकेशनला संपुर्ण ओक परिवार हजर होता.

यावेळी त्यानं बी ए. मार्केिटिंगचे शिक्षण पुर्ण केले आहे. अनेक सेलिब्रेटींनी यावेळी त्यांच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोबतच चाहत्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

परंतु एका ट्रोलरनं मात्र मिठाचा खडा टाकला आहे. ज्यावर मंजिरी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तो म्हणतो की, ''भारतातले सगळे श्रीमंत लोकं परदेशात का जातात उच्च शिक्षणासाठी ? भारतात डेवलपमेंट करत का नाहीत ?''

याखाली नेटकऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. परंतु मंजिरी यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, ''आमच्या आनंदात तुम्हाला सहभागी व्हायचे नसेल तर प्लीज आम्हाला अनफॉलो करा. पण कोणता तरी भलताच विषय काढून नजर लावू नका आणि समाजात निगेटिव्हिटी पसरवू नका''

VIEW ALL

Read Next Story