बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची बहिण प्रिया दत्त या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
अलीकडेच त्यांनी एका पोस्टमध्ये त्यांचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रिया दत्त या सुनील दत्त यांचा वारसा पुढे नेत आहेत, असं या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
मुंबई मॅराथॉनमध्ये माझं प्रत्येक पाऊल मला माझ्या वडिलांच्या स्वप्नासोबत जोडते, असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे.
सुनील दत्त यांनी दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी 2005मध्ये या उपक्रमाची सुरवात केली होती.
प्रिया यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
प्रिया दत्त या काँग्रेसच्या नेत्या व माजी खासदार आहेत. तसंच त्या सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत.
कर्करोगाच्या रुग्णांसाठी त्यांची एक संस्था काम करते. संजय दत्त यांच्या त्या खूप जवळच्या आहेत.