मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या दिवशी खास फोटोशूट केलं असून फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरने या साडीवर खास आकर्षक ज्वेलरी परिधान केली आहे.
तर या फोटोत अभिनेत्रीने केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे फूल लावले आहे.