मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार अशी सर्वांनाच आजवर उत्सुकता लागून राहिली आहे. (Photo : Zee News)
2012 साली जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा राज ठाकरे यांनी आपल्या गाडीतून त्यांना सोडले होते, तेव्हा प्रत्येकांच्या मनात विचार आलाच असेल की हे दोघं आता एकत्र आले. (Photo: Zee News)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता सार्वजनिक आणि कौंटुबिक जीवनात एकमेकांसोबत दिसतात. (Photo : Zee News)
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि त्यांच्या आयुष्यातील एक नव्या पर्वाची सुरूवात झाली. (Photo: Mid Day)
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज व उद्धव ठाकरे राजकारणाचे धडे गिरवत होते. त्त्यांच्या आयुष्यातील ते सोनेरी दिवस होते. (Photo: Zee News)
'झी मराठी' वाहिनीवर 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम येत्या 4 जूनपासून दर रविवारी रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo: Zee News)
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. (Photo: Zee News)
यावेळी अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांना त्याच सोनेरी दिवसांची आठवण करून देत दिली. ( उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा जुना फोटो Photo: @shreerangkhare | Twitter)
यावेळी त्यांचा जूना फोटो राज ठाकरेंना दाखविण्यात आला. अवधूत यांनी त्यांना विचारले, ''काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून?'' (Photo: Zee News)
त्यावर ते म्हणाले, ''खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला.... कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली'' (Photo: Zee Marathi)