राम कपूर हे टीव्ही इंडस्ट्रीतील मोठे स्टार मानले जातात. 'कसम से' आणि 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकांसाठी त्यांना तीन वेळा इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय दोन वेळा इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याने पटकावला आहे.

'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही शोमध्ये साक्षी तन्वरसोबतचा त्याचा लिपलॉक आणि 17 मिनिटांचा इंटिमेट सीन वादात सापडला होता.एकता कपूरच्या अतिशय लोकप्रिय टीव्ही शो 'बडे अच्छे लगते हैं' मध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

यामध्ये राम आणि प्रियाची रोमँटिक जोडी घराघरात प्रसिद्ध झाली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

या शोच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, एकता कपूरने राम कपूर आणि सांक्षी तन्वर यांच्यावर 17 मिनिटांचा बेडरूम सीन चित्रित केला.

एका संपूर्ण एपिसोडमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर अतिशय कामुक पद्धतीने एकमेकांवर रोमान्स करताना दिसत होते.

एका सीनमध्ये राम आणि प्रिया यांचा लिपलॉकदेखील होता. टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता.

शोची निर्माती एकता कपूरला 'बडे अच्छे लगते हैं'मध्ये अश्लीलता दाखवल्याबद्दल माफी मागावी लागली होती.

VIEW ALL

Read Next Story