रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे अभिनेते त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे संपूर्ण जगभरात तसेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.
रणवीर सिंगच्या 'पद्मावत' चित्रपटाने 560 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने त्याला 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला.
'पद्मावत' हा चित्रपट रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि हिट चित्रपट आहे. रणवीर सिंगचे या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीचे लोकप्रिय पात्र होते.
रणवीर सिंगचा आतापर्यंत फक्त 'पद्मावत' हा एकच चित्रपट या क्लबमध्ये सामील होऊ शकला आहे.
तर रणबीर कपूरचे दोन चित्रपट 'संजू' आणि 'अॅनिमल' या क्लबचा भाग आहेत.
'अॅनिमल' या चित्रपटाने 900 कोटींपेक्षा जास्त कमाई करून रणबीरच्या कपूरच्या स्टारडमला नवीन उंची मिळवून दिली.
'संजू' या चित्रपटाने 500 कोटींचा आकडा ओलांडला आणि रणबीरला पहिल्यांदाच सुपरस्टार क्लबमध्ये नेले.
आकडेवारीनुसार, रणबीर कपूरची जगभरातील बॉक्स ऑफिसवरची पकड सध्या अधिक मजबूत आहे.
तर रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट रणबीरच्या चित्रपटांना टक्कर देण्याची शक्यता आहे.