'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काजोल आणि राणी चुलत बहिणी असूनही एकमेकांशी अजिबात बोलत नव्हत्या.

जेव्हा करणने हे पाहिलं तेव्हा तो स्वतःच गोंधळला. राणी आणि काजोल या बहिणी असल्याचं करणला माहीत होतं.

राणीचे वडील राम मुखर्जी आणि काजोलचे वडील शोमू मुखर्जी चुलत भाऊ होते.

याच कारणामुळे बहिणी एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत करण जोहरला आश्चर्य वाटलं.

यावर काजोल म्हणाली की, असं काही नाही. जेव्हा कामाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही दोघे जिथे आहोत तिथे आनंदी आहोत.

''कारण मी आणि काजोलला लहानपणापासून ओळखत होतो आणि माझ्यासाठी ती काजोल दीदी होती, त्यामुळे ते थोडं विचित्र होतं. मला असे वाटते की जेव्हा तुम्ही वेगळे वाढता तेव्हा तुम्हाला खरोखर माहित नसतं. कारण तुम्ही कमी भेटता. तनिषा आणि मी जास्त संपर्कात होतो आणि आजही आहोत, पण काजोल दीदी नेहमी कुटुंबातील मुलांशी जवळ होती.''

''त्यामुळे ते थोडे विचित्र होते. राणी पुढे म्हणाली की, जरी दोघांचेही एकमेकांशी संभाषण झाले नाही तरी आमचे वडील एकमेकांच्या खूप जवळ होते. आमच्या दोन्ही वडिलांच्या निधनानंतर आम्ही एकमेकांचा आधार झालो. मी काजोलच्या वडिलांच्या खूप जवळ होते. जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा तुम्ही जवळ येता. आज आमच्या दोघांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे.''

VIEW ALL

Read Next Story