शाहरुख खान 2026 मध्ये 'किंग' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोणही चित्रपटाचा भाग असणार आहे.
आता या चित्रपटात आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली आहे, ती म्हणजे राणी मुखर्जी.
रिपोर्ट्सनुसार, स्क्रिप्ट ऐकताच राणीने लगेचंच ही भूमिका स्वीकारली.
ती पूर्ण चित्रपटात दिसणार नसली तरी एका कॅमिओ भूमिकेत झळकणार आहे.
राणी मुखर्जी सुहानाच्या आईची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग 20 मेपासून सुरू होणार आहे. तो पुढील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाचे शूटिंग 20 मेपासून सुरू होणार आहे. तो पुढील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी आणि अभय वर्मा यांचाही सहभाग असणार आहे.