लवकरच रश्मिका मंदाना सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटचं 'जोहरा जबीन' हे गाणं प्रदर्शित झालं असून सलमान आणि रश्मिका त्यावर थिरकताना दिसले.
अलीकडेच तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. यामध्ये तीने साधी मोरपिशी रंगाची साडी नेसलेली आहे.
या फोटोमध्ये रश्मिका साडीचा पदर सरळ करताना खूप सुंदर दिसत आहे.
यामुळेच तिला तिच्या कॉलेजच्या दिवासांची आठवण आली.
अभिनेत्रीने सांगितले, "अनेक वेळा एवढी घाईघाई होते की माझा मेकअप, हेअरस्टाइल सगळं मला करावं लागतं".
स्वतःच्याच हाताने तयार झाल्यावर ती तिच्या खास मैत्रिणीला "माझे फोटो क्लिक कर" असं सांगते.
तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्येदेखील अस्संच व्हायचं.