हृतिक रोशन सोबतचा 'ज्युनियर क्रिश' आज काय करतोय?

Published by: Zee Team | Jul 04, 2024

2006 मध्ये 18 वर्षापूर्वी रिलीज झालेला हृतिक रोशनचा क्रिश हा चित्रपट सुपरहिट ठरला.यामध्ये बालकलाकार म्हणून अभिनय करणाऱ्या मिकी आता पूर्णपणे बदलला आहे.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

क्रिश चित्रपटात मिकीने ज्युनियर क्रिशची भूमिका केली होती. तर हृतिकसोबत प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

आता हा ज्युनियर क्रिश एवढा बदलला आहे की आपण ओळखू देखील शकत नाही. हा छोटा क्रिश आता अभिनय क्षेत्र सोडून डॉक्टर झाला आहे.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

मिकीने स्वत:च सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नेत्र चिकीत्सक बनल्याचे सांगितले आहे.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

सोशल मीडियावर पोस्ट करत मिकीने असे लिहिले आहे की, मला ज्युनियर क्रिशची भूमिका साकारत एका चित्रपटात टॅलेंटेड कलांकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटाचा एक भाग बनणं अगदी आनंददायी अनुभव होता.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

बालकलाकार ते नेत्र चिकित्सक बनण्यापर्यंतचा माझा अनुभव एक विलक्षण प्रवास आहे. माझ्यातील हे परिवर्तन आश्चर्यकारक अनुभवांनी आणि विलक्षण शिक्षणाने भरले आहे ज्याने मला आज मी कोण आहे याची नव्याने ओळख करून दिली.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

तो म्हणतो की, माझा अभिनय क्षेत्रात मिळालेले शिक्षण आज मला डोळ्यांची काळजी घेण्याच्या करिअरमध्ये प्रेरणा देत आहेत.पावलोपावली दिलेल्या अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे. आता मी सुपरहिरो बनून तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

मिकीच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने असे लिहिले आहे की, मला तुझावर क्रश होतो. मला तुझे डोळे खूप आवडतात. तर दुसऱ्या चाहत्याने असे लिहिले की माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

Published by: Zee Team | Jul 04, 2024

VIEW ALL

Read Next Story