भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवले.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर काश्मीरमधून परतले होते.
सुदैवाने त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखरूप घरी परतले. मात्र शोएब आणि दीपिकाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर शोएब इब्राहिमनेही प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ऑपरेशन सिंदूरचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोएबने लिहिले, 'जेव्हा निष्पापांच्या रक्ताचा बदला घेतला जातो, तेव्हा न्यायाला कधी कधी त्याचा खरा अर्थ मिळतो.'
पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करताना शोएबने यापूर्वी म्हटले होते की, 'मुस्लिम म्हणून मला लाज वाटते.'
काश्मीरहून परत आल्यानंतर व्लॉग सुरू करण्याबाबत बोलल्यानंतरही त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.