प्रेक्षकांमुळे इथपर्यंत आलो

एकीकडे लोकांच्या प्रतिक्रियांची मजा घेत असल्याचं सांगताना आकाशने, "प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत," असंही सांगितलं.

फोटो पोस्ट करतो आणि...

सोशल मीडियावरील फोटोंबद्दलही आकाशने प्रतिक्रिया देताना, "आम्ही फोटो पोस्ट करतो आणि त्यानंतर त्यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येतात. आम्ही या प्रतिक्रियांचा आनंद घेतो," असं सांगितलं.

रिंकूबरोबरच्या नात्याबद्दलही केलं भाष्य

रिंकूबरोबरच्या नात्याबद्दलही आकाशने भाष्य केलं आहे. "आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. याहून अधिक आम्हाला दोघांमध्ये काहीच नाही," असं आकाशने स्पष्टपणे सांगितलं आहे.

त्या बातम्यांवर आकाश म्हणाला...

आकाशने रिंकूला डेट करत असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही दोघे डेट करत असल्याच्या बातम्या फक्त अफवा आहेत," असं आकाशने स्पष्ट केलं आहे.

आकाशने दिलं उत्तर

मात्र मागील काही काळापासून सुरु असलेल्या या चर्चांवर आकाशने थेटपणे भाष्य करत माहिती दिली आहे.

फोटोंमुळे चर्चांना उधाण

रिंकू आणि आकाश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून त्यांच्या काही फोटोंवरुन ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रिलेशनची जोरदार चर्चा

'सैराट'ला अनेक वर्ष झाली असली तरी आता पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये जोर धरु लागली आहे.

अनेकदा दिसतात एकत्र

'सैराट'मुळे रिंकू आणि आकाश एकमेकांचे फार चांगले मित्र झाले आहेत. ते अनेकदा वेगवगेळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून येतात.

तुफान लोकप्रिय झाले

आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु आणि परशा ही भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसरला 'सैराट'ने तुफान लोकप्रियता मिळवून दिली.

'सैराट'मुळे घरोघरात पोहोचले

'सैराट' चित्रपटामधून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.

VIEW ALL

Read Next Story