भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव आरजे महवशसोबत जोडले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महवश आणि चहल अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले.
आयपीएल 2025 दरम्यानही हे दोघं एकत्र दिसले होते. त्यांच्यातील नात्याबाबत त्यांनी अधिकृतपणे काहीही जाहीर केलं नसतानाही, सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट आणि कमेंट्समुळे चर्चांना उधाण आलं आहे.
नुकतेच एका नेटकऱ्याने महवशच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट केली की, 'महवश फक्त फॉलोवर्ससाठी चहलसोबत आहे. तिने अलीकडेच क्रिकेट पाहायला सुरुवात केली आहे.'
या ट्रोलला उत्तर देताना महवशने स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. हे उत्तर पाहून चाहते महवशचे कौतुक करत आहेत.
तिने लिहिलं, 'मी 2019 पासून क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत आहे. तुझं ज्ञान शून्य आहे छोटू!'
चहल आणि महवश यांचं नातं जरी अजून अधिकृत नसलं, तरी महवश सतत त्याच्या पाठीशी उभी राहिलेली दिसते.
चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी 2025 मध्ये घटस्फोट घेत आपापल्या आयुष्याचा नवा मार्ग स्वीकारला आहे.