'डोक्यात यशाची हवा गेली अन्...' रोनित रॉयने सांगितलं दारू कशी सुटली?

रोनित रॉय

'कसोटी जिंदगी की' या मालिकेमध्ये मिस्टर बजाजची भूमिका साकारणाऱ्या रोनित रॉयला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

दारूचं व्यसन कसं सुटलं?

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रोनित रॉयने आपबिती सांगितली. त्यावेळी त्याने दारूचं व्यसन कसं सुटलं? यावर भाष्य केलं.

मुलीमुळे दारु सोडली

मी शुटिंगच्या सेटवर दारुच्या नशेत येत होतो. त्याचा परिणाम त्याच्या इमेजवर व्हायला लागला. मात्र, माझ्या मुलीमुळे मला दारु सोडता आली, असं रोनित रॉयने म्हटलं आहे.

डोक्यात हवा गेली...

कलाकार म्हणून यश मिळाल्यानंतर माझ्या डोक्यात यशाची हवा गेली. मी हिरो झालो होतो, हे यश संपेल असं मला वाटलं नव्हतं. मला खुप वाईटरित्या दारुचं व्यसन लागलं होतं.

मी दारुच्या नशेत...

दारुच्या नशेत मी एकामागून एक चुका करत गेलो. मी सेटवर वेळेवर जात होतो. मात्र, मी दारुच्या नशेत असायचो, असं रोनितने सांगितलंय.

माझं काम परफेक्ट व्हायचं पण...

मी शुटिंगच्या चार तास आधी दारु प्यायचो. त्यामुळे त्याचा परिणाम दिसत होता. माझं काम परफेक्ट व्हायचं. पण मी झोपू शकत नव्हतो. कोणाला माझ्यासारखा अॅक्टर आवडेल? असा सवाल देखील त्याने केलाय.

माझी मुलगी...

माझ्या मनात एक भीती आहे. माझी मुलगी लॉस एँजेलिसमध्ये शिकते. मला बायको आहे. मला फोबिया आहे की, सर्वजण काय विचार करतील? त्यांना जर मध्यरात्री काही झालं तर...?

माझा फोन अनरिचेबल लागला तर

त्यांनी मला गरजेवेळी कॉल केला अन् माझा फोन अनरिचेबल लागला तर? मी त्यामुळे दारु सोडून दिली. आता मी वर्षातून एक किंवा दोनदा पितो, पण व्यसन लागू देत नाही, असंही रोनितने म्हटलंय.

जान तेरे नाम

रोनितने आपल्या करियरची सुरूवात जान तेरे नाम या सिनेमापासून केली होती. त्यामुळे तो रातोरात स्टार झाला होता.

VIEW ALL

Read Next Story