गेल्या काही दिवसांपासून गिरिजा ओक नॅशनल क्रश असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मात्र, चाहत्यांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे ती म्हणजे साई पल्लवी.
अप्रतिम सौंदर्य आणि नेहमी सिंपल लुकमध्ये दिसणारी साई सध्या चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा विनामेकअफ लुक पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
तसेच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
लवकरच साई पल्लवी ही 'रामायण' या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे.