बर्थडेनिमित्त सई पोहोचली खास ठिकाणी; हा धबधबा आहे तरी कुठे?

Intern
Jul 02,2025


सई ताम्हणकरचं खास बर्थडे सेलिब्रेशन; पाऊस, धबधबा, गॅलरी आणि...


मान्सूनचा आनंद घेण्यासाठी आणि जीवनातील आणखी एक वर्ष अतिशय खास पद्धतीनं साजरा करण्यासाठी अभिनेत्री सई ताम्हणकरणं एक खास सेलिब्रेशन केलं.


मान्सून म्हटलं की अनेकांचीच पावलं धबधबे आणि ट्रेकिंगच्या वाटांकडे वळतात आणि सईसुद्धा इथं अपवाद ठरली नाही.


सईनं तिच्या इंस्टाग्राम वरून वाढदिवस नेमका कसा साजरा केला याची कल्पना देणारे काही फोटो शेअर करत त्यावर 'बर्थडे डम्प' असं कॅप्शन लिहिलं.


शेअर केलेले फोटो पाहता मित्रमंडळींसह अभिनेत्रीनं मान्सून ट्रिपचा मनसोक्त आनंद घेतल्याचं पाहायला मिळत आहे.


राहिला मुद्दा सई नेमकी कुठं गेली होती, याबाबतचा तर तो भंडारदरा येथील वसुंधरा धबधबा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.


पर्यटनाची प्रचंड आवड असल्यामुळे सई अशा नयनरम्य पर्यटन स्थळांना कायमच भेट देत असते. यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यात आणखी एका ठिकाणाची भर पडली असं म्हणायला हरकत नाही.


आणि हो...पावसाळ्यात तुमचाही वाढदिवस येत असेल तर सईसारखाच 'सही' प्लान तुम्हीसुद्धा करुच शकता!!! [सर्व छायाचित्र सौजन्य सई ताम्हणकर हिच्या सोशल मिडीया अकाउंट वरुन घेण्यात आले आहेत.]

VIEW ALL

Read Next Story