सैफ अली खान कुटुंबासह लंडनमध्ये

'आदिपुरुष' चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटावरुन रान पेटलं असतानाच सैफ अली खान मात्र कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवत आहे.

करीनाने योग दिनाला शेअर केला होता फोटो

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करीना कपूरने सैफ अली खानचा मुलासंह योगा करतानाचा फोटो शेअर केला होता.

लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद

आता करीनाने लंडनमधील सुट्ट्यांचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही बीबीसी अर्थ एक्स्पिरियन्समध्ये वेळ घालवत असल्याचं दिसत आहे.

बीबीसी अर्थ एक्स्पिरियन्समध्ये मुलांची मजा

करीनाने मुलं तैमूर आणि जेह यांचेही फोटो शेअर केले आहेत. फोटोत दोघंही अंतराळाचा अनुभव घेत मस्ती करत असल्याचं दिसत आहे.

कुटुंबासह मॉर्निग वॉक

काही दिवसांपूर्वी करिनाने सैफ आणि मुलांसह मॉर्निंग वॉक करतानाचा फोटो शेअर केला होता.

लंडनमधील हाइड पार्कमध्ये जेहची मस्ती

तर सैफची बहिण सबा अली खानने जेहचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. फोटोत जेह लंडनमधील हाइड पार्कमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

करीना आणि सैफ बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं

करीना आणि सैफ बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. त्यांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

करीना लवकरच वेब शोमध्ये दिसणार

करीना कपूर लवकरच सुजॉय घोषच्या वेब शो 'The Devotion of Suspect X' मध्ये दिसणार आहे.

'आदिपुरुष'मुळे सैफ चर्चेत

दुसरीकडे सैफ अली खान सध्या आदिपुरुष चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरत एका तेलुगू चित्रपटात तो व्हिलन साकारताना दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story