'सैराट'मधील आर्चीची मैत्रिण अनी सध्या काय करते?

Soneshwar Patil
Mar 17,2025


नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु आणि परश्या यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.


अगदी त्याच प्रमाणे आनी म्हणजेच अनुजा मुळे हिच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी दाद दिली.


मात्र, सैराट चित्रपटातील अनी कुठल्याच चित्रपटात दिसली नाही. ती सध्या काय करते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


छोटे केस, पंजाबी ड्रेस आणि सतत आर्चीसोबत दिसणारी अनी तिच्या अनोख्या भूमिकेमुळे खूप चर्चेत आली होती.


परश्याला थेट शेतात बोलवण्यासाठी आर्चीला मदत करणारी अनी होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.


तिने अभिनय सोडून अभ्यासात लक्ष देत वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या चित्रपटाला आता 8 वर्ष पूर्ण झाली आहेत.

VIEW ALL

Read Next Story