मराठी सिनेसृष्टीत 'सैराट' चित्रपटातून दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली.
'सैराट'च्या यशानंतर तिने 'कागर', 'झुंड', 'आशा', 'झिम्मा 2' यांसारख्या चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
रिंकू सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असून तिच्या पोस्ट्स सतत चर्चेत असतात.
नुकतेच तिने लोहगड येथील एका रिसॉर्टवर रॉयल फोटोशूट केले असून, त्यातील लूक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
काळ्या रंगाचा लेहेंगा, सोनेरी किनारी, गळ्यात चोकर हार आणि हातात बांगड्या असा तिचा लूक पाहायला मिळतो.
या लूकसह तिने ऐश्वर्या रायच्या गाजलेल्या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला असून, त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, सुयश टिळक, किशोरी शहाणे, आदित्य सरपोतदार यांसारख्या कलाकारांनी रिंकूचं कौतुक केलं.
अवघ्या काही तासांत या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्यूज मिळाले असून चाहत्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.