बाहेरुनच इंडस्ट्री ग्लॅमरस दिसते

मी इंडस्ट्री बाहेरून पाहिली, जिथून ती खूप ग्लॅमरस दिसते. मला वाटले की लाँच केल्यानंतर गोष्टी सोप्या होतील, असे आयुषने म्हटलं आहे.

स्वतःला सिद्ध करावं लागतं

एक चित्रपट आयुष्य बदलेल असे मला वाटले होते. पण हा मोठा बुडबुडा होता, जो आता फुटला आहे. लाँच तुम्हाला मदत करतa, पण नंतर तुम्हाला दर शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर स्वतःला सिद्ध करावं लागतं.

चित्रपटांमध्ये काम करणे जास्त महत्त्वाचे

चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याची फारशी घाई नाही, भलेही मला लाइमलाइटपासून दूर राहावे लागले तरी चालेल, असेही आयुष म्हणाला

तरच प्रेक्षक तुम्हाला लक्षात ठेवतील

माझ्यासाठी दररोज स्पॉटलाइटमध्ये असणे इतके महत्त्वाचे नाही. मला वाटतं फक्त कामच महत्वाचं आहे. तुम्ही चांगले काम करत असाल तर प्रेक्षक तुम्हाला लक्षात ठेवतील.

अभिनेता आणि इन्फ्लुएंसरमध्ये फरक नाही

मला वाटते की अभिनेता आणि इन्फ्लुएंसर यांच्यातील रेषा आता पुसट होत चालली आहे. मला हे आवडत नाही. पण हे दुसऱ्याच्या फायद्याचे असेल तर मला अडचण नाही.

मला अॅक्शन फिल्म मिळाली नाही

'लव्हरात्री' नंतर मला अॅक्शन फिल्म करायची होती. पण मला कोणीही अॅक्शन स्क्रिप्ट दिली नाही. मी चॉकलेट बॉय, लव्हर बॉय झालो, असेही आयुष म्हणाला.

10 वर्षापूंर्वी सलमानच्या बहिणीसोबत लग्न

आयुष शर्माने 2014 मध्ये सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.

VIEW ALL

Read Next Story