वयाच्या 59व्या वर्षीही सलमान खानचा जबरदस्त फिटनेस; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Intern
Apr 12,2025


सलमान खान आपल्या फिटनेसकडे नेहमीच खूप लक्ष देतो. तो आता 59 वर्षांचा असला, तरीही एकही दिवस व्यायाम करणे चुकवत नाही.


अलीकडेच सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो झाडावर चढून बेरी तोडताना दिसतो.


वयाच्या या टप्प्यावरही त्याचा सहजतेने झाडावर चढणे आणि तंदुरुस्त राहणे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.


हा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर सलमानच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं जात आहे.


व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलं आहे, 'बेरी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.'


हा व्हिडीओ त्याच्या घराजवळील गॅलेक्सी अपार्टमेंट्स परिसरातील असल्याचं दिसते. कारण सलमान याआधीही एका बेरीच्या झाडाचा उल्लेख करताना दिसला होता.


एका जुन्या मुलाखतीत सलमानने सांगितलं होतं की लहानपणी तो आपल्या घराजवळच्या झाडांवर चढून बेरी तोडून खायचा.


सलमान सध्या 'सिकंदर' या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story