Sara @ 30: बर्थ डे गर्ल साराचे टॉप 5 चित्रपट; यापैकी तुम्ही किती पाहिलेत?

Published by: Intern | Aug 12, 2025

गर्ल नेक्ट डोअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सारा अली खान! आज म्हणजेच 12 ऑगस्ट सारा तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by: Intern | Aug 12, 2025

वयाच्या तिशीत प्रवेश करणाऱ्या या अभिनेत्रीच्या लाखो चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आज तिच्या चित्रपटांचाही सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

Published by: Intern | Aug 12, 2025

नेपोटिझममधील काही मोजकी उदाहरणं अशी आहेत जी खरोखरच आपल्या कलेच्या जोरावर पुढे आली आहेत. त्यामध्येच साराचं नाव घेतलं जातं. साराचे गाजलेले चित्रपट कोणते हे पाहूयात...

Published by: Intern | Aug 12, 2025

सिम्बा

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले आणि 'ई-टाइम्स'च्या अहवालानुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 240.3 कोटी रुपयांची कमाई केली.

Published by: Intern | Aug 12, 2025

जरा हटके जरा बचके

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 88.35 कोटी रुपयांची मोठी कमाई केली.

Published by: Intern | Aug 12, 2025

केदारनाथ

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत आणि सारा अली खानच्या 'केदारनाथ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 68.57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

Published by: Intern | Aug 12, 2025

लव्ह आज कल

इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' हा एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात तिने कार्तिक आर्यनसोबत काम केले होते, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 39.76 कोटी रुपये कमावले.

Published by: Intern | Aug 12, 2025

मेट्रो... इन डिनो

2025 मध्ये प्रदर्शित झालेला 'मेट्रो... इन डिनो' चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 24 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 52.1 कोटी रुपये कमावले.

Published by: Intern | Aug 12, 2025

VIEW ALL

Read Next Story