शुभमन नाही... सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट?

Pooja Pawar
May 04,2025


माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.


सारा तेंडुलकर मागील काही वर्षांपासून युवा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला नव्हता. त्यानंतर काही महिन्यांपासून सारा आणि शुभमनमध्ये सर्व काही आलबेल नसून त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा देखील होत्या.


सारा तेंडुलकर ही आता शुभमन गिलला नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.


असं म्हटलं जातंय की सारा ही अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं असून फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार सारा आणि सिद्धांत एकमेकांना डेट करतायत.


फिल्मफेअरने सांगितल्यानुसार सारा आणि सिद्धांत यांच्यात खूप चांगलं बॉण्डिंग असून दोघे एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवतात.


सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. सारा आणि सिद्धांत यांची केमेस्ट्री खूप चांगली आहे.


अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने बंटी और बबली, गली बॉय, नादानीय इत्यादी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story