शाहिद कपूरच्या पत्नीला काय झालेलं? डॉक्टरही हैराण

पत्नीचं कौतुक

अभिनेता शाहिद कपूर संधी मिळेल तेव्हातेव्हा त्याच्या पत्नीचं कौतुक करताना दिसतो. त्याची, पत्नी मीरासुद्धा कायमच शाहिदच्या कामात त्याला साथ देताना दिसते. यावेळी मात्र मीरानं तिच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगाचा उलगडा मुलाखतीदरम्यान केला.

बाळंतपण

2015 मध्ये शाहिदसोबत वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मीरानं 2016 मध्ये मुलीला जन्म दिला. पण, तिचं हे पहिलं बाळंतपण अनेक अडचणींचं होतं, असं मीरानं मुलाखतीत सांगितलं.

तीन महिने अंथरुणात

नुकत्याच पॉडकास्टदरम्यान पहिल्या गरोदरपणाचा अनुभव सांगताना आपण आपलं पहिलं मुल जवळपास गमावलं होतं, असं सांगताना मीरानं ती जवळपास तीन महिने अंथरुणातच असल्याचा उलगडा केला.

गर्भपात

चार महिन्यांची गर्भवती असताना मीरानं आपला जवळपास गर्भपात झाला होता. पण, जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांनीही हैराण होत, आता आरामच कर... असा सल्ला दिल्याचं सांगितलं.

वजन

वजन आधीच वाढलं होतं, त्यात चार महिन्यांचा गर्भ या परिस्थितीमध्ये आपण बाळाला कधीही गमावू शकतो, असा इशाराच डॉक्टरांनी मीराला दिला आणि यामुळं तिला धक्का बसला होता.

आजारपण

आजारपणाशी आणि गर्भधारणेदरम्यानच्या आव्हानात्मक काळाशी झुंजताना मीरासाठी संपूर्ण कुटुंब एकवटलं होतं. डॉक्टरांनी मीराला रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला आणि तिथंच गोष्टी बदलल्या.

मिशा

जेव्हा मिशाचा (मीरा- शाहिदची मुलगी) जन्म झाला तेव्हा डॉक्टरही या घटनेला चमत्कारच समजत होते. किंबहुना तुमची लेक चमत्कारानंच जन्माला आली, असं डॉक्टर शाहिद आणि मीराला म्हणाले होते.

VIEW ALL

Read Next Story