अक्षय कुमारनं 'शंभू' गाण्यातून केलं म्युजिकच्या जगात डेब्यू!

Published by: Zee Team | Feb 05, 2024

या गाण्याचे बोल अभिनव शेखर यांनी लिहिले असून गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमारने हे गाणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. अक्षय कुमार स्वतःला शिवभक्त म्हणवतो.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

2023 मध्ये आलेल्या 'OMG 2' चित्रपटात भगवान शिवाची भूमिका साकारणारा अक्षय म्हणाला, 'शंभू माझ्या हृदयातील खोल जागेतून येतो, जो फक्त जय श्री महाकालच्या नावाने धडधडतो.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

अभिनेता पुढे म्हणाला मी बराच काळापासून शिवभक्त आहे पण अलीकडे माझा त्यांच्याशी असलेला संबंध आणि भक्ती आणखीनच घट्ट झाली आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

अभिनेता पुढे म्हणाला, भगवान शिव शक्ती, प्रेम आणि गरज असेल तेव्हा मदत देखील करतात.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

पुढे अभिनेता म्हणाला, यासोबतच तो रक्षणकर्ता आहे, तोच शरणागती आहे, ज्याला आपण सर्वांनी शरण जायचे आहे, तोच सर्वांचा अंत आहे. या गाण्याने मी फक्त शिव म्हणजे अनंत चैतन्याला एक थेंब अर्पण करतो! जय श्री महाकाल.''

Published by: Zee Team | Feb 05, 2024

अक्षय कुमारच्या शंभू या म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांनी अवघ्या काही वेळातच डोक्यावर घेतलं आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story