श्वेता तिवारीने लेकीच्या करिअरबाबत घेतला मोठा निर्णय; प्रत्येक पालकांसाठी असेल धडा!

Intern
Apr 11,2025


टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तसेच तिच्या फिटनेसचही सर्वजण नेहमीच कौतुक करतात.


श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच तिच्या नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी श्वेता खूप उत्साहित आहे.


'भूतनी' हा पलकचा आगामी चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटात संजय दत्त, मौनी रॉय, सनी सिंग आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट अक्षय कुमारच्या 'केसरी 2' ला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.


पलकने शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर करताना तिच्या आईच्या पाठिंब्याबद्दल सांगितले. तिच्या मते, श्वेता तिवारीने कधीही तिच्यावर निर्णय लादले नाहीत.


पलक म्हणते, 'आईने मला माझ्या करिअरबाबत स्वतः निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा दिली आहे. ती नेहमी सांगते की, 'हे तुझे करिअर आहे, त्यामुळे निर्णय तुझाच असावा.'


'मुलीने स्वतःच्या वाटचालीचे निर्णय स्वतः घ्यावेत.' असे श्वेता तिवारीला वाटते. मात्र, जेव्हा गरज भासते तेव्हा ती नेहमीच तिच्या मदतीस धावून येते.

VIEW ALL

Read Next Story