सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या सिद्धार्थ जाधवची संपत्ती किती?

Soneshwar Patil
Mar 23,2025


सोशल मीडियावर इंडस्ट्रीमधील कलाकारांचे मानधन आणि त्यांच्या एकूण संपत्तीची नेहमी चर्चा असते.


अशातच मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार सिद्धार्थ जाधव त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे.


सिद्धार्थ जाधवने कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची अनेक शिखरं गाठली आहेत.


गेल्या 25 वर्षांपासून सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. त्याने अनेक नाटकांमध्ये, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. आहे.


अशातच त्याच्या मानधन आणि संपत्तीच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. त्याची संपत्ती 40 कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.


अशातच अभिनेत्याने यावर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्याला संपत्तीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने 25 वर्षांच्या करिअरमध्ये 41 कोटींच्या पुढे संपत्ती असल्याचं सांगितले.

VIEW ALL

Read Next Story