'सन ऑफ सरदार 2'मध्ये ‘टीटू’च्या भूमिकेत झळकणारे विंदू दारा सिंग यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. पाहूयात सविस्तर
विंदू दारा सिंग यांच्या पत्नी दीना उमारोवा ही रशियन मॉडेल आहे. जिच्या सौंदर्यासमोर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची चमक फिकी पडते.
विंदू दारा सिंग यांचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझसोबत झाले. 2002 मध्य त्यांनी घटस्फोट घेतला आणि 2006 मध्ये दीना उमारोवा सोबत दुसरं लग्न केलं.
लग्नाआधी दीना मॉडेलिंगमध्ये सक्रीय होती पण लग्नानंतर तिने ते क्षेत्र सोडून कंपनीची सीईओ बनण्याचा निर्णय घेतला.
‘नच बलिए सीझन 6’मध्ये या दोघांनी जोडीने सहभाग घेतला. जरी त्यांना लवकरच शोमधून बाहेर पडावे लागले तरी प्रेक्षकांच्या मनात त्यांनी जागा मिळवली.
दीना सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोशूटवर चाहते नेहमी फिदा होत असतात. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.
चाहत्यांना आजही या जोडीची एकत्रित झलक पाहण्यासाठी आणि दीना उमारोवाच्या अदाकारीसाठी आतुरता असते.