सोनू सूदचं व्हॉट्सॲप अकाउंट ६१ तासांनंतर पुन्हा सुरू, काय आहे प्रकरण?

Published by: Zee Team | Apr 28, 2024

खरं तर, त्याचे व्हॉट्सॲप अकाउंट 61 तासांपूर्वी बंद झालं होतं, त्यानंतर ते आता सुरु झालं आहे.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

स्वत: अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आणि त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

इतकंच नाही तर एवढ्या दिवसांपासून त्याचं अकाऊन्ट बंद असल्याने त्याच्या व्हॉट्सॲपवर हजारो मेसेजच्या रांगा लागल्या आहेत.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

अलीकडेच, सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितले की त्याचे व्हॉट्सॲप खाते बंद झाल्यानंतर, त्याला मोठ्या संख्येने मॅसेज आले आहेत, ज्याची संख्या पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, 'शेवटी माझे व्हॉट्सॲप परत सुरु झालं आहे. 61 तासात फक्त 9483 मेसेज. धन्यवाद'.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

याआधी शनिवारी सोनूने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली होती.

Published by: Zee Team | Apr 28, 2024

VIEW ALL

Read Next Story