ठेवला होता 7 दिवस उपवास
श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यामध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन नातं खूप छान होतं. श्रीदेवी रजनीकांत यांच्या अभिनयाची मोठी फॅन होती.
श्रीदेवी ही उत्तम अभिनेत्री तर होतीच पण ती आपल्या चांगलपणामुळेही प्रसिद्ध होती. तिच्या सहकलाकारांशी तिचं खास नातं होतं.
रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपट केले आहेत. 1976 मधील मंद्रू मुदिचू या चित्रपटात 25 वर्षीय रजनीकांतची 13 वर्षीय श्रीदेवी यांनी आईची भूमिका केली होती.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एकदा रजनीकांतसाठी श्रीदेवी यांनी 7 दिवस उपवास ठेवला होता. याबद्दल खुद्द रजनीकांत यांनी खुलासा केला आहे.
2011 मधील रजनीकात राणा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलवण्यात आले होते.
त्यावेळी रजनीकांत लवकर बरे व्हावे म्हणून श्रीदेवी यांनी 7 दिवस उपवास ठेवला होता. एवढंच नाही तर श्रीदेवी पुण्यातील साईबाबा मंदिरात रजनीकांत यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली होती.