नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या भव्य चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हे प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.
आता या चित्रपटातील इतर कलाकारांची अधिकृत यादी समोर आली आहे. पाहूयात कोण साकारणार आहे कोणती भूमिका.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता रवि दुबे लक्ष्मण यांची भूमिका साकारणार आहेत.
हनुमान यांच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहेत.
कन्नड सुपरस्टार यश रावण या खलनायकाची भूमिका साकारणार आहे. यश चित्रपटाची निर्मीती करण्यासाठी नमित मल्होत्राला सामील झाला आहे.
रकुल प्रीत शूर्पणखा, रावणाची बहीण या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
राजा दशरथ यांची भूमिका अरुण गोविल साकारतील. विशेष म्हणजे, त्यांनी 1987 च्या प्रसिद्ध 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका केली होती.
विवेक ओबेरॉय विद्युतजिव्हा, शूर्पणखाचा पती, याची भूमिका साकारणार आहे.
कैकेयी या महत्त्वाच्या भूमिकेत लारा दत्ता झळकणार आहेत.
अभिनेत्री शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहेत.
सिनेविश्वातील महानायक अमिताभ बच्चन जटायू यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.