अहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत असणारा 'सैयारा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
12 दिवसात त्याने जगभरात 400 हुन अधिक कोटींची कमाई केलीये.
चित्रपटात दाखवण्यात आलेली अनेक ठिकाणं सुद्धा प्रेक्षकांना आवडली आहेत.
महाराष्ट्र, गोवा, मानली इत्यादी ठिकाणांवर सैयारा चित्रपटाची शूटिंग झालीये.
यापैकी मुंबईतील सेंट जेविअर्स कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, बांद्रा किल्ला या ठिकाणांवर सैयाराची शूटिंग झाली आहे.
अलिबागमधील काही समुद्र किनाऱ्यांवर सुद्धा या चित्रपटाचं शूटिंग झालंय.
मनालीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग नग्गर किल्ल्यात झाली असून धुंधी ब्रिजच्या जवळ सुद्धा काही सीन सूट झाले आहेत.
गोव्यातील काही प्रसिद्ध चर्च सुद्धा तुम्ही या चित्रपटात पाहू शकता.