बहुचर्चित वेबसिरिज 'ताली' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेळी सुष्मिता सेनच्या किलर परफॉर्मन्सनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरिज प्रेक्षकांची मनं जिंकून घेते आहे.
ट्रान्सजेंडरचं आयुष्य जगणं हे कोणासाठीच सोप्पंच नाही. त्यातून गौरी सावंत यांचा आत्तापर्यंत प्रवास काहीच सोप्पा नव्हता.
आज त्यांचा प्रवास हा वेबसिरिजच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट हा प्रेक्षकांसमोर आला आहे.
यावेळी रवी जाधव यांनी एक छानसा किस्सा सांगितला आहे. याचा व्हिडीओ सुष्मिता सेननं इन्टाग्रावर शेअर केला आहे.
रवी जाधव यांनी यावेळी सुष्मिता सेन हिनं परिधान केेलेल्या रूद्राक्षांच्या माळेबद्दल सांगितलं आहे.
ती म्हणाले की, ''आम्ही चित्रपटाचे शूटिंग करत असताना गौरी सावंत यांच्याकडे एक रुद्राक्षची माळ होती.''
''ती माळ त्यांनी काढली आणि सुश्मिता सेनला आशीर्वाद म्हणून दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या ‘ही माळ कायम सोबत ठेव.’”, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही जेव्हा याची स्क्रिप्ट लिहिली होती तेव्हा त्यात कुठेच या माळेबद्दल उल्लेख नव्हता''
''पण गौरी यांनी सुश्मिताला ती माळ दिली आणि त्यानंतर जेव्हा सुश्मिताने 'गौरी' हे पात्र साकारलं, तेव्हा कायमच ती माळ तिनं गळ्यात घातली”, असं ते म्हणाले.