तब्बूची आई तिला 'चपलीने मारीन' असे का म्हणाली?

Feb 27,2025


चित्रपट निर्माते रवि चोप्रा यांच्या पत्नी रेनू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये 'बागबान' चित्रपटाविषयी एक खूलासा केला.


रेनू चोप्रा म्हणाल्या, हेमा मालिनीच्या भूमिकेसाठी पहिली पसंत तब्बू होती. पण तिने हा चित्रपट नकारला.


आधी या चित्रपटाची कथा ऐकून तिला अश्रू अनावर झाले होते. पण, तिने 'चार मुलांच्या आईची भूमिका साकारणार नाही' असे सांगितले.


बागबान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बू तिच्या आईसोबत चित्रपट पाहायला गेली होती.


पाहताना तब्बू आईला म्हणाली, "आधी या चित्रपटाची ऑफर मला करण्यात आली होती."


हे ऐकताच तब्बूची आई तिच्यावर खूप संतापली.


एवढेच नाही तर रागाच्या भरात "ही चप्पल काढून तुझ्या डोक्यावर मारीन" असे म्हणाली.

VIEW ALL

Read Next Story