लाल टिकली, भेदक नजर अन्...; ब्रेकअपमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीच्या अदांनी चाहते घायाळ

Intern
Apr 09,2025


तमन्ना भाटियाचा चित्रपट 'ओडेला 2'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या निमित्ताने तिने एक खास फोटोशूट केलं आहे.


या फोटोशूटमधील तमन्नाचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


तमन्नाने लाल रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.


त्यासोबतच तमन्नाने लाल टिकली, झुबकेदार कानातले आणि आकर्षक ब्रेसलेट घातले आहेत.


केसांमध्ये माळलेले गुलाब तमन्नाच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत.


तमन्नाच्या या फोटोंसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना वेगवेगळ्या पोझमध्ये कॅमेऱ्यासमोर आपली अदा सादर करत आहे.


तमन्नाचा 'ओडेला 2' हा चित्रपट 17 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तिच्या नव्या लूकमुळे चाहते अजूनच उत्सुक झाले आहेत.


'ओडेला 2'मध्ये तमन्ना भाटिया शिव शक्तीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेत असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story