अजय देवगनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रेड 2' येत्या 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अजय देवगन पुन्हा एकदा अमय पटनाईक या लोकप्रिय भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक खास आयटम साँग सुद्धा असणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी खास डान्स साँगचे आयोजन केले असून, या आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया झळकणार आहे.
अजय देवगनने याची एक छोटी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि त्याने लिहिले, 'तमन्नाची नशा सर्वांच्या हृदय आणि मनावर राज्य करेल.'
'रेड 2' मधील हे आयटम साँग 11 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सध्या सेटवरील तमन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती जबरदस्त नृत्य करताना दिसत आहे.
तमन्ना भाटिया सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. ती 'रेड 2'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातही 'रेड'च्या टीमसोबत उपस्थित होती.
याआधी तमन्नाने 'स्त्री 2' मधील 'आज की रात' या गाण्यामुळे खूपच लोकप्रियता मिळवली होती. तसेच 'जेलर' चित्रपटातही तिने एका स्पेशल साँगमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता.