तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' प्रेक्षकांना खटकली, कारण...

मालिका विश्वातील लाडकी सून म्हणून ओळख असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान कमबॅकसाठी सज्ज झालीये.

'होणार सून मी या घरची', 'अग्गं बाई सासूबाई' या चित्रपटातील तिची भूमिका फारच लोकप्रिय झाली होती.

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील जान्हवी ही तिची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यामुळं प्रेक्षकांना आता तिच्या नव्या मालिकेची उत्सुकता आहे.

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत राज हंचनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुक्ता आणि सागर अशी त्यांच्या पात्रांची नावे आहेत.

मालिकेचा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रोमोमध्ये मुक्ता कधीही आई होऊ शकणार नाही असं दाखवलं आहे तर, दुसरीकडे सागर एका मुलीचा सईचा बाप असून त्याचं लग्न जमवण्यासाठी त्याची आई प्रयत्न करताना दाखवली आहे.

मात्र, दोघांची वेगवेगळी कारणे असल्यामुळं ते लग्न करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत. मात्र, सईमुळं दोघंही एकमेकांसमोर येतात, असं दाखवण्यात आलं आहे.

ये है मोहब्बते

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना ही मालिका ये है मोहब्बते या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं वाटतं आहे.

नकळत सारे घडले

शिवाय सारख्याच विषयावरील एक मालिका काही वर्षांपूर्वी येऊन गेली होती. 'नकळत सारे घडले' या मालिकेमध्येही हेच कथानक दाखवण्यात आलेले. त्यामुळं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे

VIEW ALL

Read Next Story