Jyoti Chandekar Passes Away : मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं आहे.
ज्योती चांदेकर या मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई आहेत.
ज्योती यांच्या निधनानं 'ठरलं तर मग' मालिकेचे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
मात्र, अद्याप त्यांच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. त्यांची 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका होती.
ज्योती चांदेकर या 1969 मध्ये एका हिंदी सिनेमाचं शुटींग बघायला गेल्या होत्या. तिथे अनेक लहान मुलींना बोलावलं होतं.
तिथे मराठी मुलींना हिंदीमध्ये काही ओळी बोलून दाखवायच्या होत्या. त्यावेळी ज्योती यांनी त्या सहज वाचून दाखवल्या.
त्यानंतर लगेच दिग्दर्शकांनी त्यांना मेकअप करायाला सांगितले. 'सुंदर मी होणार' या नाटकासाठी त्यांची निवड झाली होती.